Delhi Lal Quila Blast : दिल्ली स्फोटानं हादरली, मुंबईत हायअलर्ट… मेट्रो परिसरात नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं जे सांगितलं ते भयानक
दिल्लीतील लाल किल्ल्यासमोरच्या पार्किंगमध्ये झालेल्या भीषण इको व्हॅन स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. पावणे सातच्या सुमारास झालेल्या या स्फोटात अनेक वाहने पूर्णतः उद्ध्वस्त झाली. मुंबईत हाय अलर्ट जारी करत सुरक्षा वाढवण्यात आली आहे, तर तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोरच्या पार्किंगमध्ये पावणे सातच्या सुमारास एका इको व्हॅनमध्ये भीषण स्फोट झाला. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, आसपासच्या तीन ते चार गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या, तर आठ ते दहा इतर वाहनांचेही मोठे नुकसान झाले. अनेक वाहनांचे फक्त सांगाडेच शिल्लक राहिले. या स्फोटामुळे परिसरात मोठी आग लागली होती. स्फोटानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, मुंबईमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) च्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. स्फोटाचे नेमके कारण आणि इको व्हॅन किती वेळापासून पार्किंगमध्ये उभी होती, याबाबत तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतका भयानक होता की रस्त्यावर मानवी अवयव विखुरले होते.
Published on: Nov 10, 2025 09:13 PM
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
