Delhi Vidhan Sabha Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार असून ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर निवडणुकीच्या मतांची मतमोजणी म्हणजेच निवडणुकीचा निकाल ८ तारखेला जाहीर होणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज समोर आल्या आहेत. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार असून ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर निवडणुकीच्या मतांची मतमोजणी म्हणजेच निवडणुकीचा निकाल ८ तारखेला जाहीर होणार आहे. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सातत्यानं विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे, यावर देखील या पत्रकार परिषदेमधून निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केल्याचे पाहायला मिळाले. ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगानं ईव्हीएम हॅक करता येत नाही असं म्हटलं आहे. तर सायंकाळी सहानंतर अचानक मतदानाची टक्केवारी वाढली कशी? असा सवालही महाविकास आघाडीकडून करण्यात येत होता. यावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं की, सायंकाळी साडेसहाला जो आकडा जाहीर करण्यात येतो, त्यामध्ये मतदानाची पूर्ण टक्केवारी सांगता येणं अवघड असतं, मात्र अंतिम टक्केवारी ही रात्री आकराच्या सुमारास येते अशी माहितीही त्यांनी दिली.
Published on: Jan 07, 2025 03:59 PM
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
