Ajit Pawar | कुणी मास्क लावला नसेल, मग तो मी असेल करी बाहेर काढा – अजित पवार
कोरोना संकटातही विधानसभेत बेफिकीर असणाऱ्या सदस्यांना अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या. देशात कोरोनाचं संकट कायम आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधानही कोरोना संकटावर गंभीर आहेत. त्यामुळे देशात रात्रीचा लॉकडाऊन लावण्यावर उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे, असं अजित पवार म्हणाले.
मुंबई: सभागृहात मास्क घालून न येणाऱ्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज चांगलेच संतापले. कोरोनाचं संकट अजून गेलं नाही. ओमिक्रॉनचा धोका आहेच पण अजून नवीन विषाणूही आला आहे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाची गंभीर दखल घेतली आहे. आता तर रात्रीचा लॉकडाऊन करण्याचा राष्ट्रीय स्तरावर विचार सुरू आहे, अशी माहिती अजित पवार यांनी साभागृहात दिली. त्यामुळे रात्रीचा लॉकडाऊन लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोरोना संकटातही विधानसभेत बेफिकीर असणाऱ्या सदस्यांना अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या. देशात कोरोनाचं संकट कायम आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधानही कोरोना संकटावर गंभीर आहेत. त्यामुळे देशात रात्रीचा लॉकडाऊन लावण्यावर उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे, असं अजित पवार म्हणाले.
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
