भाजपने नांदेडमधून लोकसभेचं फुंकलं रणशिंग, अमित शहा यांच्याकडून ‘इतक्या’ जागा जिंकण्याचा संकल्प
VIDEO | नांदेडमधून अमित शहा यांच्याकडून महाराष्ट्रातील लोकसभेत 'इतक्या' जागा जिंकण्याचा संकल्प
नांदेड : नांदेडमधून लोकसभा निवडणुकीसाठीचं भाजपने रणशिंग फुंकलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तब्बल 45 जागा महाराष्ट्रातून निवडून आणणार, असा मोठा संकल्प भाजप नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असल्याचं केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जाहीर केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची नांदेडमध्ये जाहीर सभा झाली. यामध्ये अमित शाह यांनी भाषण केलं. अमित शाह यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत असताना मोठा दावा केला. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 45 जागा जिंकण्याचा निर्धार केल्याची घोषणा अमित शाह यांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा संकल्प केला असल्याचे अमित शाह यांनी म्हटलं. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला विकासात पुढे आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले, अशा शब्दांत अमित शाह यांनी उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...

