ED Raid भाजपचे लोक धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का?, छगन भुजबळांचा सवाल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Mar 31, 2022 | 1:04 PM

भाजपचे लोक धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का? असा सावाल मंत्री छगन भुजबळ यांनी नाना पटोलेंच्या वकिलांवर झालेल्या ईडी कारवाईवरुन केलाय. राज्यात ईडीचं धाडसत्र सुरुच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीनं पहाटे धाड टाकली.

मुंबई : भाजपचे लोक धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का? असा सावाल मंत्री छगन भुजबळ यांनी नाना पटोलेंच्या वकिलांवर झालेल्या ईडी कारवाईवरुन केलाय. राज्यात ईडीचं धाडसत्र सुरुच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीनं पहाटे धाड (ED Raid) टाकली. जवळपास पाच तास चाललेल्या या धाडसत्रानंतर आता सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतलंय. ईडीच्या या धाडीनंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर (Central Investigation Agency) जोरदार हल्ला चढवलाय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI