AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा

| Updated on: Aug 17, 2026 | 10:28 PM
Share

एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना पक्षात येऊ दिलं नाही, असा मोठा दावा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केला आहे. शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाला होता, मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटीपूर्वी राजीनामा देण्याची अट ठेवण्यात आल्याने ते काँग्रेसमध्ये येऊ शकले नाहीत, असं दलवाई यांनी म्हटलं आहे. दरम्यान, […]

एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना पक्षात येऊ दिलं नाही, असा मोठा दावा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केला आहे. शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाला होता, मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटीपूर्वी राजीनामा देण्याची अट ठेवण्यात आल्याने ते काँग्रेसमध्ये येऊ शकले नाहीत, असं दलवाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आमदार होते आणि अनेक कारणांसाठी आपली भेट घेत होते, असं म्हटलं आहे. शिंदे आणि आपली चर्चा झाली होती, मात्र त्या चर्चेतील माहिती जाहीर करणार नसल्याचं चव्हाणांनी स्पष्ट केलं. तसेच मुंडे यांच्याबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी केलेला दावा योग्य असल्याचंही हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे.

Published on: Aug 17, 2026 10:28 PM

Follow Us