‘गल्लीतल्या नेत्यांनी मर्यादा सांभाळाव्यात’, शिवसेनेच्या नेत्यानं कुणाला सुनावलं?
VIDEO | 'कल्याण-डोंबिवली'साठी शिंदे-भाजप गटातील वाद टोकाला जाणार?
ठाणे : कल्याण-डोंबिवली आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपचे दोन नेते आमने-सामने आले आहेत. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी कल्याण-डोंबिवली आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. तर शिंदे गटाचे प्रवक्ते माजी महापौर नरेश म्हस्के यांनी गल्लीतल्या नेत्यांनी मर्यादा संभाळून बोलावं, अशी सडकून टीका केली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा मतदारसंघावरून रुसवे-फुगवे सुरू झाले आहेत. तर लोकसभा मतदारसंघावर हक्क सांगण्याचा हा वाद टोकाला जाणार का? असा सवालही सध्या चर्चेत आहेत. नरेश म्हस्के यांनी संजय केळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं आलेलं सरकार, मागील 10 महिन्यांपासून आलेली सत्ता बहुतेक केळकरांना पटलेलं दिसत नाहीये. त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून नेहमी हे दिसून येत, असा टोला लगावतानाच केळकरांचं बोलण एवढं सीरियसली घेण्याची गरज नाही, असं नरेश म्हस्के म्हणाले.
Published on: Jun 12, 2023 04:26 PM
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
