अनोख्या मैत्रीची चर्चा : मित्र सरपंच झाला…आनंदात मित्रांनी दिली फॉर्च्युनर गाडीची भेट
मित्र सरपंच झाला म्हणून दुसऱ्या मित्राने सुमारे ३५ ते ४० लाखांची फॉर्च्युनर गाडी भेट दिली.पुणे जिल्ह्यात असलेल्या केसनंद गावातून दत्तात्रय हरगुडे सरपंच झाले. त्यांना सरपंच पदमिळताच थेट फॉर्च्युनर कार भेट दिली आहे.
पुणे : पुणेकर नेहमी हटके असतात. काहीही वेगळे करण्यात त्यांचा हात कोणीही धरु शकत नाही. मग त्या पुणेरी पाट्याच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचा विषय असो की राजकीय…आता पुणे जिल्ह्यातून अशीच आगळीवेगळी बातमी आली आहे. मित्र सरपंच झाला म्हणून दुसऱ्या मित्राने सुमारे ३५ ते ४० लाखांची फॉर्च्युनर (fortuner car )गाडी भेट दिली.पुणे जिल्ह्यात असलेल्या केसनंद गावातून दत्तात्रय हरगुडे सरपंच झाले. त्यांना सरपंच पदमिळताच थेट फॉर्च्युनर कार भेट दिली आहे. ही गाडी सर्व मित्रांनी मिळाली. या घटनेची चर्चा परिसरात जोरात सुरु आहे.
Published on: Jan 13, 2023 08:43 AM
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
