मेरा आवाज हिंदुस्थान की आवाज है, पोलीस कोठडीतून बाहेर येताच सदावर्तेंची घोषणाबाजी
सातारा पोलिसांच्या (satara police) ताब्यात असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आज सकाळी सातारा पोलीस सदावर्ते यांना कोर्टात घेऊन गेले.
सातारा पोलिसांच्या (satara police) ताब्यात असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आज सकाळी सातारा पोलीस सदावर्ते यांना कोर्टात घेऊन गेले. त्यांना कोठडीतून कोर्टात नेत असताना सदावर्ते यांनी जोरजोरात घोषणा द्यायलाय सुरुवात केली. वंदे मातरम… मेरी आवाज हिंदुस्थान की आवाज है… अशा जोरजोरात घोषणा सदावर्ते यांनी दिल्या. हात उंचावून सदावर्ते घोषणा देत होते. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर किंचितशी चिंताही दिसत होती. मात्र, सदावर्ते घोषणा देत असतानाच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना गाडीत बसवले आणि कोर्टाच्या दिशेने घेऊन गेले. आज सदावर्ते यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. 2020 साली खासदार संभाजी छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना कोर्टात सादर केलं जाणार आहे. त्यामुळे कोर्ट त्यावर काय निर्णय देतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published on: Apr 15, 2022 12:27 PM
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
