‘5 रंगांचा झेंडा एका रंगाचा कसा झाला?’, Shrimant Kokate यांचा Raj Thackeray यांना सवाल
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना श्रीमंत कोकाटे म्हणाले की, कोण कोकाटे ते समजून घेण्यासाठी राज ठाकरे यांनी माझं भाषण ऐकायला यावं. तसंच कोकाटेच्या वर्गाला येऊन बसावं म्हणजे त्यांना समजेल कोकाटे कोण ते, असं आव्हानच कोकाटे यांनी राज यांना दिलंय. राज ठाकरे यांना खरं शिवचरित्र माहिती नाही. त्यांनी पुरंदरे भक्तीतून बाहेर पडावं.
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना श्रीमंत कोकाटे म्हणाले की, कोण कोकाटे ते समजून घेण्यासाठी राज ठाकरे यांनी माझं भाषण ऐकायला यावं. तसंच कोकाटेच्या वर्गाला येऊन बसावं म्हणजे त्यांना समजेल कोकाटे कोण ते, असं आव्हानच कोकाटे यांनी राज यांना दिलंय. राज ठाकरे यांना खरं शिवचरित्र माहिती नाही. त्यांनी पुरंदरे भक्तीतून बाहेर पडावं. त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेली पुस्तकं वाचण्याची गरज आहे, म्हणजे त्यांचे गैरसमज दूर होतील, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावलाय. माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने कोकाटे यांच्या भाषणाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

