Pankaja Munde Shayari | तुम मुझे कब तक रोकोगे, भगवान भक्तीगडावरुन पंकजा मुंडे LIVE

तुम्ही गप्प बसलात तर माझा आवाज तुम्हाला ऐकू येईल, असं उपस्थित समुदायाला पंकजा मुंडे म्हणाल्या. तुम मुझे कब तक रोकोगे, पंकजा मुंडेंनी शायराना अंदाजात एकप्रकारे पक्षांतर्गत आणि पक्षातील विरोधकांना देखील इशारा दिलाय.

आज विजयादशमी आणि दसरा आहे. दसऱ्याची भक्ती आणि शक्तीची परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी उन्हा ताणात घरची पुरणपोळी सोडून मैदानात उपस्थित झालात त्याबद्दल नतमस्तक होऊन पाया पडते. तुमच्या प्रेमासमोर माझी झोळी कमी पडतेय. भगवान बाबांची भक्ती आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची शक्ती ही वैभवाची पंरपरा सुरु ठेवण्याचं श्रेय तुम्हा सर्वांना आहे. आदरणीय महादेवराव जानकर यांनी आताच भाषण केलं. आपल्या लाडक्या खासदार प्रीतम ताईंना भाषण केलं. मंचावर खासदार सुजय विखे पाटील, माझ्या वडिलांचे अत्यंत लाडके कर्डिले साहेब, तीन जिल्ह्यांचे आमदार सुरेश आण्णा धस, प्रविणजी घुगे, मोहन दादा, मंचावर उपस्थित धोंडे साहेब, नमिता मुंदडा, एवढे नावं घेत बसलो तर बाबा इथेच संध्याकाळ होईल. किती देखणा कार्यक्रम आहे. तुम्ही गप्प बसलात तर माझा आवाज तुम्हाला ऐकू येईल, असं उपस्थित समुदायाला पंकजा मुंडे म्हणाल्या. तुम मुझे कब तक रोकोगे, पंकजा मुंडेंनी शायराना अंदाजात एकप्रकारे पक्षांतर्गत आणि पक्षातील विरोधकांना देखील इशारा दिलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI