Nawab Malik Live | ईडी माझ्या घरी आली तर मी त्यांचं स्वागत करेन- नवाब मलिक LIVE
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik on ED) वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापेमारी झाल्याची माहिती देण्यात आली मात्र, सात ठिकाणी काही व्यक्तींच्या घरी कारवाई करण्यात आली अशी माहिती आहे, असं म्हटलं.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik on ED) वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापेमारी झाल्याची माहिती देण्यात आली मात्र, सात ठिकाणी काही व्यक्तींच्या घरी कारवाई करण्यात आली अशी माहिती आहे, असं म्हटलं. नवाब मलिक यांनी यासंदर्भात प्रेस घेत माहिती दिली.वक्फ बोर्डाच्या वतीनं 7 एफआयर दाखल करण्यात आल्या होत्या. वक्फ बोर्डाच्या 30 हजार संलग्नित संस्थांची चौकशी करण्याची मागणी करतो, असं नवाब मलिक म्हणाले.
पुण्यातील ट्रस्ट आहे ताबूत इनाम एंडोमेंट ट्रस्ट, तालुका मुळशी जिल्हा पुणे हे वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहे. हा ट्रस्ट 19 मे 2009 धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून वक्फ बोर्डाकडे वर्ग झाला.लोकशाही आघाडीचं सरकार बनल्यानंतर वक्फ कायदा लागू करण्यात आला. त्यानंतर धर्मादाय आयुक्ताकडे असलेल्या संस्थांचं डीम्ड रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्या सरकारमध्ये मी राज्यमंत्री होतो आणि आम्ही वक्फ बोर्ड कायदा 1995 ला लागू केला, असं नवाब मलिक म्हणाले.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

