अजित पवार पुन्हा गायब? पुण्यातला ‘हा’ कार्यक्रम टाळला अन् दौराही रद्द, राजकीय चर्चांना उधाण
VIDEO | अजित पवार यांचं आजचेही कार्यक्रम रद्द, कुठे होता दौरा? पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पुणे : पुण्यात आज अजित पवार एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती आहे. मात्र अजित पवार यांनी कार्यक्रम टाळल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार शेतकरी मेळाव्याला येणार नसल्यामुळे आयोजकांनी वेळेवर शरद पवार, सुप्रिया सुळेंना निमंत्रित केलं. अजित पवारांचा आज पुरंदर तालुक्याचा नियोजित दौरा होता. मात्र अजित पवारांनी पुरंदर दौरा अचानक रद्द केला. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. तर काही दिवसांपूर्वी अचानक १७ तास नॉट रिचेबल राहिले अन् आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं. पुण्यातल्या एका कार्यक्रमाचा दौरा त्यांनी अचानक रद्द केल्याने आता अजित पवार यावर कोणतं कारण देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Published on: Apr 17, 2023 12:31 PM
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
