Ladki Bahini Yojana : महिलांनो… ‘लाडकी बहीण’बाबत सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ लाभार्थीना योजनेतून वगळणार
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबद्दल प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हे पैसे वाटल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील महिलांसाठी एक मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबद्दल प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर अन्य योजनांचा लाभ घेत असल्याची त्याचीही तपासणी कऱण्यात येणार आहे. ज्या कुटुंबांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे, अशा कुटुंबातील लाभार्थीना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरवर्षी जूनमध्ये लाभार्थी महिलांना माहिती द्यावी लागणार आहे. लाभार्थींना आपली सगळी माहिती (ई- केवायसी) पद्धतीने द्यावी लागणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत तब्बल 2 कोटी 63 लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या होत्या. तर गेल्याच आठवड्यात लाडकी बहीण योजनेतील निकषांना न पाळता गैर फायदा घेणाऱ्या तब्बल पाच लाख महिलांना सरकारकडून अपात्र ठरवण्यात आलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गेल्या सात महिन्यांत सुमारे 25 हजार 250 कोटी रुपये लाभार्थी महिलांना देण्यात आले आहे. हे पैसे वाटल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?

