Anil Parab यांच्या CAच्या घरी 24 तास उलटले तरी आयकर विभागाकडून छापेमारी सुरुच

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Mar 09, 2022 | 10:21 AM

शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्या सीएच्या घरावर सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा आयकर विभागाची छापेमारी ही सुरूच असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्या सीएच्या घरावर सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा आयकर विभागाची छापेमारी ही सुरूच असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांना आयकर विभागाने टार्गेट केलं असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलून दाखवलं आहे.मंगळवारी सकाळी आयकर विभागाने आदित्य ठाकरेच्या निकटवर्तीय राहूल कनाल यांच्या घरी छापेमारीला सुरूवात केली. राहूल कनाल हे बांद्रा परिसरात राहतात. तिथं दिवसभर आयकर विभागाने त्यांची चौकशी केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दिवसभर चौकशी करत असताना कनाल यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच तिथल्या परिसरात अनेक शिवसैनिक सुध्दा दिसत होते. रात्री उशिरा राहूल कनाल यांची चौकशी संपल्यानंतर पोलिसांनी राहूल यांच्या घरातून काही फायली चौकशीसाठी घेतले असल्याची माहिती मिळत आहे. चौकशी संपल्यानंतर बांद्रा घराच्या अनेक शिवसैनिक जमा झाले होते. त्यावेळी राहूल कनाळ यांनी शिवसैनिकांची भेट घेतली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI