कोल्हापूर पाठोपाठ कागलमध्ये स्टेटसवरू हिंदुत्ववादी संघटना आक्रमक? आज बंद हाक, काय सुरू काय बंद
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. येथे एका तरुणाने टिपू सुलतानचे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याने तणाव निर्माण झाला. त्यानंतर आझ बंदची हाक हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आली.
कोल्हापूर : सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर कोल्हापुरात हिंसाचाराची घटना घडली होती. या घटनेला आठवडा पूर्ण होतो ना होतो तोच काल (रविवारी) कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. येथे एका तरुणाने टिपू सुलतानचे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याने तणाव निर्माण झाला. त्यानंतर आझ बंदची हाक हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आली. तसेच संबंधीत तरुणाला अटक करण्याची मागणीही संघटनानी केली होती. मात्र पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेत मध्यस्थी करून बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. यामुळे सध्या कागल शहरात तणावपूर्ण शांतता असून चौकाचौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तर आज आठवडी बाजार सुरू झाला आहे. राज्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट करण्याचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसात छत्रपती संभाजीनगर, बीड, नवी मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाचे उद्दातीकरणावरून तणावाची स्थिती झाली होती. तर कोल्हापुरात दंगलीसारखी परिस्थिती उद्भवली होती.
Published on: Jun 12, 2023 11:54 AM
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
