Karuna Sharma | करुणा शर्माच्या जामीनावर आज होणार सुनावणी

जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या करुणा शर्मा यांच्या जामिनावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयात ही सुनावणी होईल. यावेळी न्यायालय करुणा शर्मा यांना जामीन देणार किंवा नाही, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

करुणा शर्मा बीडमध्ये असताना त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आले होते. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. 6 सप्टेंबरला पोलिसांनी करुण शर्मा यांना न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने करुणा शर्मा यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यता आलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI