Kirit Somaiya | अजित पवारांनी स्वत:चा कारखाना विकत घेतला, माझ्याकडे घोटाळ्याचे सगळे पुरावे

पवार कुटुंबियांनी बॅंकेची नवी सिस्टम तयार केलीये. पवार कुटुंबियांनी यावर बोलावं की जरंडेश्वर साखर कारखाना स्वत:चा कुटूंबियांना कसा दिला… पवारांनी नौटंकी बंद करावी, असं किरीट सोमय्या म्हणाले.

उद्या जरंडेश्वर साखर कारखान्याच्या घोटाळ्याची तक्रार शेतकऱ्यांना सोबत घेऊन ईडी ऑफिसकडे करणार आहे. २७ हजार शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणार. स्वत:चा कारखाना स्वत:च घेतला, माझ्याकडे सगळे घोटाळ्याचे पुरावे आहेत. त्यांच पद रद्द झालं पाहिजे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

आम्ही जनतेचे प्रतिनिधी, किरीट सोमय्या काॅमन मॅन आहे. २००८-२००९ मध्ये दोन बिल्डरकडून १५० कोटी मिळाले.  हेच ते बिल्डर. ही अजित पवारांची बॅलेंसशीट आहे. हे बिल्डर अजित पवारांचे पार्टनर आहेत का, हे शरद पवारांनी स्पष्ट करावं. रोहीत पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी उत्तर द्यावे, असं आव्हानही किरीट सोमय्या यांनी दिलं.

पवार कुटुंबियांनी बॅंकेची नवी सिस्टम तयार केलीये. पवार कुटुंबियांनी यावर बोलावं की जरंडेश्वर साखर कारखाना स्वत:चा कुटूंबियांना कसा दिला… पवारांनी नौटंकी बंद करावी, असं किरीट सोमय्या म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI