Special Report | ’10 दिवसात ठाकरे सरकारचा कोव्हिड घोटाळा बाहेर काढणार’-tv9
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी येत्या 10 दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा (Covid Center Scam) बाहेर काढणार असा इशारा दिला आहे.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी येत्या 10 दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा (Covid Center Scam) बाहेर काढणार असा इशारा दिला आहे. तसंच सोमय्या यांनी आज मुंबईतील दहिसर, बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरला भेट दिली. त्यावेळी सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार टीका करत, घोटाळा उघड करण्याचा इशारा दिलाय. तर सोमय्या यांच्या या इशाऱ्याला शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
सरकारवर आरोप करण्यासाठी जो तो खिशात कोरोना घेऊन फिरतोय. आली की टाकली पुडी… आली की टाकली पुडी… कोरोना काय कमाईचं साधन आहे का? असा सवाल पाटील यांनी केलाय. कोरोनावरुन काहीही बोलायचं आणि कोणतेही आरोप करायचे असा प्रकार सध्या सुरु आहे. सोमय्यांसारख्या माणसाने असे आरोप करणे बरोबर नाही. जिल्हा रुग्णालय काय कमाईचं साधन आहे का? कोरोना काळात लोक सेवाभावी वृत्तीने लोक शासनाला मदत करत आहेत. त्यामुळे सोमय्या यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे. त्यांनी कोरोना जाऊ दे म्हणून देवाला साकडं घातलं पाहिजे, असा सल्लाही पाटील यांनी सोमय्या यांना दिलाय.
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..

