AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसाचा गहू, हरभरा,ज्वारी पिकांना फटका! शेतकऱ्याचे मोठे नुकसान

अवकाळी पावसाचा गहू, हरभरा,ज्वारी पिकांना फटका! शेतकऱ्याचे मोठे नुकसान

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Feb 24, 2026 | 11:39 AM
Share

लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी पिके आणि फळबागांचे, विशेषतः आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा करत आहेत.

लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि ज्वारी पिकांना फटका बसला आहे. ग्रामीण लातूरमधील अनेक भागांत, विशेषतः रेणापूर तालुक्यातील डिगोळ देशमुख गावामध्ये, पिके पूर्णपणे आडवी पडली आहेत. यामुळे ज्वारी काळीभोर पडून तिला बाजारात भाव मिळत नाहीये.

फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. आंब्याला आलेला मोहोर गळून पडला असून, लागलेले आंबेही गळून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. निसर्ग आणि सरकार या दोन्हीकडून शेतकरी अडचणीत सापडल्याची भावना व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांनी शासनाकडून तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

Published on: Feb 24, 2026 11:39 AM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या