.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'भाजपची फक्त MIM या पक्षाला ऑफर द्यायची बाकी', ठाकरे गटातील कोणत्या नेत्यानं लगावला खोचक टोला?

‘भाजपची फक्त MIM या पक्षाला ऑफर द्यायची बाकी’, ठाकरे गटातील कोणत्या नेत्यानं लगावला खोचक टोला?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Aug 14, 2023 | 7:03 PM
Share

VIDEO | प्रफुल पटेल यांच्यावर इकबाल मिरची संदर्भात काय आरोप आहेत?? भाजपला प्रफुल्ल पटेल चालत असतील तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक का चालणार नाहीत?, ठाकरे गटाच्या नेत्याचा भाजपला थेट सवाल

जालना, १४ ऑगस्ट २०२३ | भाजपने आपल्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण भाजपसोबत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार असल्याने भाजपच्या ऑफरवर कोणताही निर्णय घेतला नाही, असं मोठं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी भाजपची ऑफर पूर्णपणे फेटाळल्याचं म्हटलेलं नाही. यावर ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपची फक्त MIM या पक्षाला ऑफर द्यायची बाकी आहे. कारण भाजपने महाराष्ट्रातील सगळ्या पक्षांना ऑफर दिली आहे, सगळ्या राजकीय पक्षांना ऑफर द्यायची आणि सगळ्या पक्षांना फसवायचं. अशा प्रकारे भाजपचा धंदा आहे’, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जालन्यात भाजपला खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. यावेळी प्रफुल पटेल यांच्यावर इकबाल मिरची संदर्भात काय आरोप आहेत?? भाजपला प्रफुल्ल पटेल चालत असतील तर नवाब मलिक का चालणार नाहीत? असे म्हणत अंबादास दानवे यांनी सवाल उपस्थित केला आहे.

Published on: Aug 14, 2023 07:03 PM

Follow Us