MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 15 November 2021
मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं.
मुंबई : मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयानं बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली आहे. आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बाबासाहेबांचं निधन वृद्धापकाळानं झाल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे. शिवशाहीर बाळासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने राजकीय विश्वासही दु:खद वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत शोक व्यक्त केलं आहेत.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट

