तुमचं खातं कुंभकर्णाचा बाप बनून…; धानाच्या बोनसवरुन मुनगंटीवार भडकले
विधानसभेत ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी धान बोनसच्या मुद्द्यावर अन्नपुरवठा राज्यमंत्री योगेश कदमांना चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही कार्यवाही न झाल्याने मुनगंटीवार संतप्त झाले. धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस कधी मिळणार, असा त्यांनी रोखठोक सवाल केला.
महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसचा मुद्दा उचलून धरत अन्नपुरवठा राज्यमंत्री योगेश कदमांवर जोरदार हल्लाबोल केला. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20 हजार रुपये बोनस देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी 15 डिसेंबर रोजीच त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले होते, तरीही अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला.
मुनगंटीवार यांनी मंत्री कदम यांना उद्देशून “तुमचं खातं कुंभकर्णाचा बाप बनून झोपलंय का?” असा संतप्त सवाल केला. त्यांनी धान बोनस देण्यासंबंधीचा सरकारी अध्यादेश (जीआर) दोन दिवसांत काढण्याची मागणी केली. यावर मंत्री योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, या उत्तराने मुनगंटीवार यांचे समाधान झाले नाही. शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेऊन सकारात्मक उत्तर देण्याची त्यांनी विनंती केली.
Published on: Feb 25, 2026 09:47 AM
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
