CM Oath Ceremony : ‘ते’ पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त अन् ठिकाण ठरलं
शिंदे गट शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? सत्तास्थापनेचा दावा कधी केला जाणार? यावर भाष्य करताना २ डिसेंबरनंतर कधीही सरकार स्थापन होऊ शकते, असे वक्तव्य केले होते. मात्र आता येत्या ५ डिसेंबरला महायुतीच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथ विधी होण्याची शक्यता...
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीत महायुती सरकारमधील मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. मात्र अद्याप याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. अशातच शिंदे गट शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? सत्तास्थापनेचा दावा कधी केला जाणार? यावर भाष्य करताना २ डिसेंबरनंतर कधीही सरकार स्थापन होऊ शकते, असे वक्तव्य केले होते. मात्र आता येत्या ५ डिसेंबरला महायुतीच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथ विधी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर ५ डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्याचा शपथ विधीसाठी आझाद मैदानाची चाचपणी केली जात आहे. महायुतीच्या नेत्यांचा एकमुखाने निर्णय झाला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी दादार येथील शिवतीर्थ अर्थात शिवाजीपार्कवर येत्या २ डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याचं ठरत होतं मात्र येत्या ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम आहे त्यामुळे शिवतीर्थ उपलब्ध होणार नाहीये. महायुतीला शपथविधी सोहळा हा भव्य करायचा आहे. कारणं या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री अशी अनेक लोकं या शपथविधीसाठी उपस्थितीत राहू शकतात. त्यामुळे हा विलंब होणार असून मोठं मैदान मिळवण्याच्या तयारी महायुती आहे. तर आझाद मैदानावर हा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
थार, फॉर्च्युनर गाड्या अन् बरंच काही! सांगलीत बैलगाडा शर्यतीचा धुरळा
दादागटात 2 पैकी कोणती बहीण लाडकी?रुपाली ठोंबरेंना नोटीस, कारवाई होणार?
'तो' व्हिडीओ बाहेर, जरांगेंनी आव्हान स्विकारलं अन् मुंडेंना चॅलेंज
उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी

