Bogus voters : राज्यात बूथ कॅप्चरिंग तर एक आमदार म्हणतो, बाहेरून मतदान आणलं… मोठ्या आरोपांनी खळबळ
जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात काही ठिकाणी बूथ कॅप्चरिंग झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाची निवडणूक आयोगासमोर मांडणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनी एका आमदाराच्या बाहेरून मतदान आणल्याच्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी केली. बोगस मतदारांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील काही ठिकाणी बूथ कॅप्चरिंग झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. हा मुद्दा उद्याच्या राज्य निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाटील यांनी सध्या कोणत्याही मतदारसंघाचे नाव घेण्यास नकार दिला असला तरी, त्यांच्याकडे याबाबत ठोस माहिती असल्याचे सूचित केले. दिल्ली आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाला मागण्यांचे पत्र पाठवल्याचे पाटील यांनी सांगितले, परंतु आयोगाने असे पत्र मिळाल्याचे नाकारले. यावर, पत्र दिल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांनी मतदार यादीतील लाखोंच्या घरात असलेल्या बोगस मतदारांची आणि दुबार नावांची चौकशी करून ती काढण्याची मागणी केली. याच बैठकीत उपस्थित असलेले जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांच्या आम्ही बाहेरून मतदान आणले या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. या वक्तव्याची चौकशी होणार की नाही, असा सवाल आव्हाड यांनी निवडणूक आयोगाला केला.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

