अंजली दमानियांचं पुन्हा एक टि्वट, लिहलं धक्का; कोणाकडे इशारा
त्याचदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या आणि आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एक टि्वट करत अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर निशाना साधला आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांनी राजीनामा देत पुन्हा एकदा भूकंप आणला आहे. हा भूकंप शांत होण्याची शक्यता सध्या दिसत नाही. तर आता शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी आमने-सामने आली आहे. लोक माझा सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीत केलेल्या खुलाशावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या आणि आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एक टि्वट करत अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर निशाना साधला आहे. दमानिया यांनी, मी तुझा काका देईन तुला धक्का …. अशा आशयाचं ट्विट केलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या मनसुभ्यावर पाणी फिरल्याचे म्हटलं जात आहे. याचदरम्यान त्यांनी राहुल नार्वेकर हे किरण रिजिजू यांना भेटणे अतिशय संशयास्पद आहे. विधान सभा अध्यक्षांना, केंद्रीय कायदामंत्री यांना भेटण्याचे काहीच कारण नाही. खूपच संशयास्पद असेही ट्विट केलं होतं. ज्यामुळे राज्यातील समिकरणं बदलणार असे चित्र तयार होत होतं
Published on: May 05, 2023 08:05 AM
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
