Sanjay Raut : बावनकुळेंच्या 184 आकड्याचा आणि राऊत यांच्या निर्मला वॉशिंग पावडर वक्तव्याचा संबंध काय?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपने आणखी ४ नव्या वॉशिंगमशीनची ऑर्डर दिली आहे. त्यासोबतच निर्मला वॉशिंग पावडर देखिल घेणार असल्याचे वक्तव्य केल्याने नक्की राऊतांना काय म्हणायचं आहे? असा प्रश्न मविआसह राज्यातील जनतेला पडला आहे
मुंबई : महाविकास आगाडी सरकार पडल्यापासून राज्यात अनेक उलथा पालथ होताना दिसत आहे. राज्याच्या सत्तासंघर्षांचा निकाल कधीही येऊ शकतो. त्यात हे सरकार कदाचित पडू शकते असा राजकीय नेत्यांसह काही तज्ज्ञांचा विश्वास आहे. याचदरम्यान आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपने आणखी ४ नव्या वॉशिंगमशीनची ऑर्डर दिली आहे. त्यासोबतच निर्मला वॉशिंग पावडर देखिल घेणार असल्याचे वक्तव्य केल्याने नक्की राऊतांना काय म्हणायचं आहे? असा प्रश्न मविआसह राज्यातील जनतेला पडला आहे. तर याचा थेट संबंध आता भाजपचे प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याशी लावला जात आहे. बावनकुळे यांनी बहुमताची वेळ आलीच तर शिंदे-फडणवीस सरकार ते आरामात पार करेल असे म्हटलं आहे. तर यावेळी बहुमताचा 164 चा आकडा हा 184 पर्यंत जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे वरचे 20 आमदार कोणाचे? आता मवितलेच आमदारही फुटणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Published on: Apr 12, 2023 12:30 PM
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...