AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेजुरीच्या मार्तंड देवसंस्थान समितीमधील वाद चिघळला, विश्वस्त समितीत वाद, कारण काय?

जेजुरीच्या मार्तंड देवसंस्थान समितीमधील वाद चिघळला, विश्वस्त समितीत वाद, कारण काय?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: May 26, 2023 | 8:45 AM
Share

VIDEO | जेजुरीत रास्ता रोको आणि चक्री उपोषणाला सुरूवात, जेजुरीकर नागरिक आक्रमक; वादाचं कारण काय?

पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत, खंडोबा मंदिरचे व्यवस्थापन, जत्रा -यात्रा उत्सवांचे नियोजन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवर गेल्या आठवड्यात ‘सात’ विश्‍वस्तांच्या निवडी झाल्यात. या निवडीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना डावलून जेजुरी बाहेरील सहा जणांच्या निवडी राजकीय हस्तेक्षेपामुळे जेजुरी शहरात प्रचंड नाराजीचा सूर आहे, ग्रामसभेत रास्ता रोको आणि उद्यापासून चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मागील विश्‍वस्तांची मुदत डिसेंबर 2022मध्ये संपल्याने धर्मदाय आयुक्‍त कार्यालयाकडून जाहीर निविदा प्रसिद्ध करून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार 500पेक्षा अधिक अर्ज सादर झाले होते त्या पैकी 95 अर्ज अपात्र ठरविण्यात आले तर 350 पेक्षा अधिक व्यक्‍तींच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुढील काळात शहरातील किमान 4 जण निवडण्यात याव्यात, अशी मागणी शहरातील अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली होती. पक्षश्रेष्ठीनी निवड प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे. हा जेजुरीवासीयांवर अन्याय आहे..संतप्त प्रतिक्रिया जेजुरी शहरातून येत आहेत

Published on: May 26, 2023 08:45 AM
Follow Us