‘आदित्य ठाकरेंच्या दापोलीतील मेळाव्याला राष्ट्रवादीची गर्दी, दीड-दोन हजार जमा करुन शिवसेना वाढणार नाही!’
Yogesh Kadam vs Aditya Thackeray : शिंदे गटातील आमदार योगेश कदमांनी आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेवर हल्लाबोल करत टोला लगावला. दीड ते दोन हजार जमा करुन शिवसेना वाढणार नाही, असं म्हणत योगेश कदम यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचलं. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या आरोपांना आणि टीकेला उत्तर देणार असल्याचंही ते म्हणाले.
रत्नागिरी : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे सुपुत्र योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका केली. आमदार योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंच्या दापोलीlतील मेळाव्याला राष्ट्रवादीची गर्दी जमली होती, असं म्हणत निशाणा साधला. शिंदे गटातील आमदार योगेश कदमांनी आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेवर हल्लाबोल करत टोला लगावला. दीड ते दोन हजार जमा करुन शिवसेना वाढणार नाही, असं म्हणत योगेश कदम यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचलं. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या आरोपांना आणि टीकेला उत्तर देणार असल्याचंही ते म्हणाले. 18 तारखेला मेळावा घेऊन सगळ्यांना उत्तर देऊ, असा इशारा योगेश कदम यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचाच उमेदवार हवा होता, मग मला तिकीट का दिलं, असा सवालही योगेश कदम यांनी आदित्य ठाकरे यांना उपस्थित केला.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

