Mumbai | दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्यास परवानगी द्या; मनसेची हायकोर्टात हस्तक्षेप याचिका
मुंबई लोकल प्रवासाबाबत मनसेने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. बार कौन्सिलने यापूर्वीच याचिका दाखल करुन, दोन लस घेतलेल्या वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे.
मुंबई लोकल प्रवासाबाबत मनसेने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. बार कौन्सिलने यापूर्वीच याचिका दाखल करुन, दोन लस घेतलेल्या वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. त्यातच आता मनसेने हस्तक्षेप याचिका दाखल करुन सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाची लावून धरली आहे. या याचिकेवर आता उद्या 5 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. मनसेने आपल्या याचिकेत दोन लस घेतलेल्या सर्वांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिली. यावर आता कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Follow Us
Latest Videos
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा

