MNS on Mumbai Local Train | लोकल सुरू करा अन्यथा ‘रेल भरो’ आंदोलन, संदीप देशपांडेंचा सरकारला इशारा
ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या. राजसाहेबांच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती, नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावे लागेल, असा इशाराच संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला दिला आहे
सर्वसामान्यांना त्यातही लसीचे दोन घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकलने (Mumbai Local) प्रवास करण्याची परवानगी मिळावी, म्हणून मनसे आक्रमक झाली आहे. गेल्याच आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याविषयी पत्र लिहिलं होतं. आता मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करुन राज्य सरकारला इशारा दिला आहे. ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर मनसे रेलभरो करावं लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणालेत संदीप देशपांडे?
ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या. राजसाहेबांच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती, नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावे लागेल, असा इशाराच संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला दिला आहे
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर