AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking | मोहन डेलकरांच्या कुटुंबीयांचा शिवसेनेत प्रवेश

| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Oct 07, 2021 | 8:38 PM
Share

डेलकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीत डेलकर यांच्या पत्नी शिवसेनेकडून उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनं राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. डेलकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी केल्या होत्या. डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये आमदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव लिहिलं होतं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मोहन डेलकर यांचे कुटुंबिय आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात मोहन डेलकर यांनी दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. डेलकर हे दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार होते. डेलकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीत डेलकर यांच्या पत्नी शिवसेनेकडून उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आण मुलगा अभिनव शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Follow Us
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?