भरधाव ट्रक शिवशाहीवर आल्याने अपघात, प्रवाशांना वाचवण्यासाठी चालकानं रस्त्याच्या कडेला उतरवली बस अन्…
प्रवाशांना वाचविण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस रस्त्याच्या कडेला उतरली. दरम्यान चिखल असल्यामुळे शिवशाही बसचे ब्रेकही लागले नाही. दरम्यान, रस्त्याच्या कडेला एक मोठे झाड असल्यामुळे प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
बुलढाणा जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर आगाराची ही शिवशाही बस मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघाली होती. या बसमधून ३३ प्रवासी प्रवास करत होते. ३३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या शिवशाही बसवर मोताळा जवळील परडा गाव फाट्याजवळील एका वळणावर अचानक सुसाट वेगाने जाणारी ट्रक आली. या ट्रकला बघताच शिवशाही चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच आझाद हिंद संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झालेत. या घटनेत पाच प्रवासी जखमी झालेत. यामध्ये बसमधील वाहकालाही किरकोळ इजा झाली असून काही प्रवाशांना किरकोळ इजा झाल्याची माहिती मिळतेय. वेळीच मदत मिळाल्याने मोठी जीवितहानी टळली. किरकोळ दुखापत झालेल्या जखमी प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी उपचारार्थ भरती केले आहे.
Published on: Aug 11, 2024 12:36 PM
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
