Latur-Nanded ST Accident Video : धावत्या बससमोर आली बाईक अन् पुढे काय झालं? बघा…तुमच्याही काळजाचा चुकेल ठोका
लातूर-नांदेड महामार्गावरच्या नांदगाव पाटी परिसरात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. एका एसटी महामंडळाच्या धावत्या बससमोर दुचाकी आल्याने चक्क बसच उलटल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
लातूर-नांदेड महामार्गावरच्या नांदगाव पाटी परिसरात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. एका एसटी महामंडळाच्या धावत्या बससमोर दुचाकी आल्याने चक्क बसच उलटल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या बसमध्ये तब्बल ४२ प्रवासी प्रवास करत होते. तर यामधील दोन ते तीन प्रवाशांच्या मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. नांदगाव पाटी येथे एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी नांदगाव पाटी येथेच अपघात झाला होता. या अपघातात एका दुचाकीस्वाराने आपला जीव गमावला होता. वारंवार नांदगाव पाटी येथे होणाऱ्या अपघातानंतर नांदगाव पाटी हे आता अपघातस्थळ बनत चाललंय़ का? असा सवाल सध्या चर्चेत असून लोकांच्या मनात या ठिकाणाहून प्रवास करताना धडकी भरत आहे. तर लातूर-नांदेड महामार्गावरच्या नांदगाव पाटी परिसरात झालेल्या भीषण अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ पाहताच तुमच्या देखील काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.

'माझी इच्छा नसतानाही पुरूष...', पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

'ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..', अजितदादा वैतागले

शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा

हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
