Mumbai Rain Red Alert | मुंबई पालिका प्रशासन सतर्क अन् कर्मचारी अलर्ट मोडवर, काय केलं नियोजन?
VIDEO | मुंबईतील पावसाच्या पाण्याच्या निचरा करण्यासाठी पालिका प्रशासन सतर्क, कोणतं उचललं पाऊल?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं नागरिकांना झोडपून काढलं आहे. आज गुरूवारी हवामान खात्यानं मुंबईला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी केल्यानं पावसाचा धोका पाहता महापालिका प्रशासनाने मुंबईकरांना सतर्क राहायला सांगितलंय. तसेच गरज असल्यास आणि महत्वाचं काम असेल, तरच घराबाहेर पडा, असं आवाहन मुंबई महापालिकेने केला आहे. तर सायनच्या किंग सर्कल भागात पालिका कर्मचारी अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. पाण्याच्या निचरा करण्यासाठी प्रशासनाने पंप लावले आहेत. दरवर्षी मुसळधार पाऊस झाला की हिंदमाता, सायनच्या किंग सर्कल भागात पावसाचं पाणी साचतं. त्यामुळे आता पालिकेने या भागात पंप लाऊन पाण्याच्या निचरा करण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. मुंबईसह पुणे, रायगड आणि रत्नागिरी, सातारा आणि गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ठाणे,रत्नागिरी, चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २८ गावांतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Published on: Jul 27, 2023 11:12 AM
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
