नागपुरात धुळवडनिमित्त मटन-चिकनच्या दुकानांसमोर रांगा
धुळवडीनिमित्त नागपुरातील चिकन आणि मटण मार्केटमध्ये प्रचंड गर्दी उसळली आहे. पहाटेपासूनच नागरिक मटण खरेदीसाठी रांगा लावून आहेत. मागणी वाढल्याने दरांमध्ये १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सुमारे १०,००० बोकडांच्या मटणाची विक्री आणि ५० कोटींहून अधिक उलाढालीचा अंदाज आहे, नागरिक दर वाढूनही उत्साहाने खरेदी करत आहेत.
धुळवडीनिमित्त नागपुरातील चिकन आणि मटण मार्केटमध्ये आज विक्रमी गर्दी दिसून आली. नागपूरच्या त्रिमूर्ती नगर परिसरातील मटण आणि चिकन मार्केटमध्ये पहाटेपासूनच नागरिक मटण खरेदीसाठी मोठ्या रांगा लावून होते. सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यामुळे चिकन आणि मटणाच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. काही ठिकाणी 10%, तर काही ठिकाणी 15% ते 20 % पर्यंत दरांमध्ये वाढ नोंदवली गेली.
एकूण नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास, आज सुमारे 10 हजारांहून अधिक बोकडांच्या मटणाची विक्री होण्याचा अंदाज आहे. तसेच, चिकन, मटण आणि फिश मार्केटमधून 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल अपेक्षित आहे. दर वाढले असले तरी, नागरिक मोठ्या उत्साहात खरेदी करताना दिसत आहेत. अनेक ग्राहक अर्धा तास ते एक तास रांगेत उभे राहून आपल्या पसंतीचे मटण मिळवण्यासाठी वाट पाहत होते. ही गर्दी धुळवडीच्या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून पाहिली जात आहे.
Published on: Mar 03, 2026 10:40 AM
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
