AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | जयंत पाटील अन् अजित पवार यांच्यामध्ये नेमंक झालं तरी काय?

Special Report | जयंत पाटील अन् अजित पवार यांच्यामध्ये नेमंक झालं तरी काय?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: May 24, 2023 | 6:42 AM
Share

VIDEO | जयंत पाटील यांच्या ९ तासांच्या ईडी चौकशीनंतर राष्ट्रवादीमध्ये कुजबूज सुरू, पण कारण नेमकं काय?

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची ईडीने तब्बल ९ तास चौकशी केली. यानंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी जयंत पाटील यांची विचारपूस केली. मात्र अजित पवार यांचा फोन आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये कुजबूज सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वांचे फोन आलेत पण अजित पवार यांचा एकही फोन आला नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलंय. यानंतर राष्ट्रवादीत नवी चर्चा सुरू झाली. ईडीने सोमवारी जयंत पाटील यांची साडे ९ तास चौकशी केली. राष्ट्रवादीचा आणखी एक नेता ईडीच्या टार्गेटवर आल्याने शरद पवारांपासून राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी जयंत पाटील यांची विचारपूस केली. मात्र या नेत्यांमध्ये अजित पवार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. या चौकशीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळीही त्यांना अजित पवार यांचा प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार काही कामात व्यस्त असतील म्हणून त्यांनी विचारपूस केली नसेल असं जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत तर अजित पवार विरोधी पक्ष नेते. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये हे दोन गट असल्याची चर्चाही कायम होताना दिसतेय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: May 24, 2023 06:42 AM
Follow Us