पुन्हा भाजपात येणार? चर्चेदरम्यान एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे म्हटलं…
VIDEO | भाजप प्रवेशाच्या ऑफरवर एकनाथ खडसे नेमकं काय म्हणतात?
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना अचानक उधाण आलं. त्यामुळे खडसे खरंच भाजपात जातात की नाही? हे पाहणं महत्त्वाचं होतं. भाजप नेते विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपात येण्याची ऑफर दिल्यानंतर या चर्चा सुरू झाल्यात. असे असताना खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. त्यामुळे कोणता निर्णय खडसे घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. या दरम्यान खडसे यांनी पत्रकार परिषद घेत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. “भाजप नेते विनोद तावडे आणि आम्ही गेले अनेक वर्षे सोबत काम करत होतो. भाजपमध्ये विनोद तावडेंचे योगदान खूप आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना वाटत असावे की जुन्या लोकांनी पक्षात यावे. कर्नाटकचा पराभवावरून त्यांना असे वाटले असावे की जुन्या नेत्यांनी पक्षात परत यावे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
Published on: Jun 07, 2023 07:13 AM
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
