Special Report | करुणा शर्मांच्या समर्थनात भाजप, बीडमध्ये नवी टक्कर?
करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल टाकण्यातं आलं, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आलीय. इतकंच नाही तर या प्रकरणात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत राज्याची मान खाली गेल्याची खंत व्यक्त केलीय.
बीड : जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, करुणा शर्मा यांच्यावर अन्याय होत असल्याचं मत बीड भाजपनं व्यक्त केलंय. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या समर्थनात बीड भाजप आता मैदानात उतरणार आहे, अशी घोषणाच भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केलीय. करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल टाकण्यातं आलं, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आलीय. इतकंच नाही तर या प्रकरणात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत राज्याची मान खाली गेल्याची खंत व्यक्त केलीय.
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
