“हिंदू समाजाचे खरे व्हिलन उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते”, कोणी केली टीका?
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. मात्र काँग्रेसने त्यांना डावललं, असं विधान पंतप्रधान मोदींनी केलं. यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींचा समाचार घेतला. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सिंधुदुर्ग, 09 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. मात्र काँग्रेसने त्यांना डावललं, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला आहे. “शरद पवारांविषयी एवढा आदर आहे, म्हणून पक्ष फोडला का? शरद पवार आणि काँग्रेसचं वेगळं राजकारण आहे. लालकृष्ण आडवाणी यांना राष्ट्रपती होण्यापासून पंतप्रधानांनी रोखलं किंवा त्यांना संन्यास घ्यायला लावला असं आम्ही म्हणतो का?, असं राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या या विधानानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाहा व्हिडीओ…
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

