AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaja Munde| 26 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार; मराठा आरक्षणासाठीही पुढाकार घेणार:पंकजा मुंडे

Pankaja Munde| 26 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार; मराठा आरक्षणासाठीही पुढाकार घेणार:पंकजा मुंडे

| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 8:28 PM
Share

इम्पिरिकल डाटा (Empirical Data) या महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)नं दिला पाहिजे. येणाऱ्या 26 जानेवारीपासून याच अनुषंगानं महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं वक्तव्य भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलं आहे.

बीड : राज्यात होऊ घातलेली नगरपंचायत निवडणूक (Nagar Panchayat Election) ही काळी निवडणूक आहे. ओबीसी आरक्षणा(OBC Reservation)बद्दलचा इम्पिरिकल डाटा (Empirical Data) या महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)नं दिला पाहिजे. येणाऱ्या 26 जानेवारीपासून याच अनुषंगानं महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं वक्तव्य भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलं आहे.

‘महाराष्ट्र दौरा करणार’
आष्टी नगरपंचायत निवडणूक प्रचारसभापंकजा पुढे म्हणाल्या, की ओबीसी आरक्षणासह मराठा आरक्षणाबद्दलचाही डाटा राज्य सरकारनं दिला पाहिजे. आष्टी येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. याप्रश्नी आता महाराष्ट्र दौरा करणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या वेळी व्यासपीठावर भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.