अजितदादा मुख्यमंत्री होणार का? प्रकाश आंबेडकर म्हणाले, “हे फक्त तीनच नेते सांगू शकतील”
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते मुख्यमंत्री होणार या चर्चा सुरु आहेत. अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या ट्विटमुळे देखील या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांचा भुवया उंचावल्या आहेत.
पुणे, 25 जुलै 2023 | अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर राज्यातलं राजकीय समीकरण बदललं आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून ते लवकरच मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा रंगली आहे. त्यातच आमदार अमोल मिटकरी यांचं सूचक ट्विट आणि मंत्री राष्ट्रवादी अनिल पाटील यांचं सूचक विधान यामुळे या चर्चांना चांगलाच जोर आला आहे. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार की नाही हे केवळ तीनच लोक सांगू शकतात, असं म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले यासाठी हा व्हिडीओ पाहा…
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

