OBC Reservation | भाजपचं राज्यव्यापी आंदोलन, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया
भाजपने ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने रद्द केलं या विरोधात (BJP OBC agitation) आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर आज चक्काजाम आंदोलन सुरु केलं. या आंदोलनावर प्रवीण दरेकरांनी देखील आपली प्रतिक्रिया देत कॉंग्रेवर निशाणा साधलायं.
ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. त्याविरोधात भाजपने (BJP OBC agitation) आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर आज चक्काजाम आंदोलन सुरु केलं. या आंदोलनावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. आजचं भाजपचं आंदोलन खरं असून कॉंग्रेसचं आंदोलन मात्र ढोंगी आहे. यावर चर्चा व्हायला हवी. विधीमंडळाच्या अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा उचला आम्हीही मदत करतो असंही दरेकरांनी म्हटलंय.
Published on: Jun 26, 2021 12:47 PM
Follow Us
Latest Videos
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार

