Gold and Silver Surge: दिवाळीपूर्वी सोनं-चांदीचे दर गगनाला, ‘हीच’ 5 कारणं ज्यामुळं ऐतिहासिक उच्चांक गाठला!
दिवाळीपूर्वीच सोनं आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. गेल्या नऊ महिन्यांत सोन्याचा भाव सव्वा लाखांच्या पुढे, तर चांदीचा भाव दीड लाखांवरून १.७६ लाखांवर गेला आहे. जागतिक अस्थिरता आणि वाढलेल्या मागणीमुळे गुंतवणूकदारांचा कल वाढला असला तरी, सामान्य नागरिक आणि लग्नाचे बजेट यामुळे संकटात सापडले आहे.
सोनं आणि चांदीचे दर दिवाळीपूर्वीच ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत. रोज हजारो रुपयांनी वाढणाऱ्या या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि लगीनघरवाल्यांचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. इतिहासामध्ये प्रथमच १० ग्रॅम सोन्याचा भाव सव्वा लाखांच्या पुढे गेला आहे, तर चांदीने १ लाख ७६ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या फक्त नऊ ते दहा महिन्यांत सोनं-चांदीच्या दराने सर्व मागील विक्रम मोडले आहेत. १ जानेवारी २०२५ रोजी ७६,५८३ रुपये तोळा असलेले सोनं केवळ २७० दिवसांत सव्वा लाखांवर पोहोचले आहे. त्याचप्रमाणे, १ जानेवारी २०२५ रोजी ८६,०५५ रुपये प्रति किलो असलेली चांदी आता १,७६,००० च्या पुढे गेली आहे, म्हणजेच जवळपास दुप्पट झाली आहे.
भारतात जवळपास ८०% चांदीची आयात होते, मात्र जगभरात चांदीचा तुटवडा भासू लागल्याने आणि अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्कामुळे किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. जागतिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सोन्या-चांदीकडे आकर्षित होत असल्याने त्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. या वाढत्या भावांमुळे सोन्याची खरेदी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागली आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

