स्वतंत्र लढण्याच्या अनुषंगानं कामाला लागा, Raj Thackeray यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईच्या एमआयजी क्लब इथ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले आहे.
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईच्या एमआयजी क्लब इथ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून या बैठकीकडे राज्यातील मनसे सैनिकांचं लक्ष लागलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीत (Municipal Corporation Election) मनसे आणि भाजपची युती होणार का याबाबत देखील आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय. एमआयजी क्लबमध्ये सुरु असलेल्या बैठकीला मनसे आमदार राजू पाटील, अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित आहेत. राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आणि रणनिती संदर्भात मनसेची बैठक बोलावण्यात आलेली आहे. मुंबई , पुणे , पिंपरी चिंचवड , ठाणे येथील पक्ष पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेकडून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

