शेतकऱ्याचा नादच खुळा, थेट ‘थार’नंच नांगरलं शेत; कुठं पाहायला मिळाली शेतकऱ्याची कमाल?
VIDEO | वाह... क्या बात है ! युवाशेतकऱ्याची कमाल, 'थार'ने नांगरली थेट 1 एकर शेती
पुणे : सध्या मान्सूनपूर्व शेती मशागतीच्या कामांमध्ये शेतकरी वर्ग व्यस्त आहे. यामध्ये कोणी बैल जोडी किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची नांगरणी शेतकरी करीत असतात. मात्र लोणी देवकर येथील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये लोणी देवकर येथील शेतकरी अनिल मधुकर तोंडे या युवा शेतकऱ्याने चक्क थार गाडीने आपली शेती नांगरली आहे. गाडीने चक्क लोणी देवकर येथील शेतकरी अनिल मधुकर तोंडे या युवा शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील नांगरणीसाठी थार या गाडीचा उपयोग केल्याने तालुक्यात त्यांच्या या अनोख्या कृतीची चर्चा रंगली आहे. त्यांनी या गाडीने तब्बल एक दोन सऱ्या नव्हे तर जवळपास एक एकर क्षेत्र थार या गाडीच्या सहाय्याने नांगरले आहे. गाडीला मागील बाजूस बैलाच्या सहाय्याने नांगरणी करणारा नांगर दाव्याच्या मदतीने जोडून पठ्ठयाने नांगरणी केल्याचे पाहायला मिळत आहे.
Published on: Jun 13, 2023 06:32 AM
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
