पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात तब्बल 21 हजार सूर्यफुलांची आरास, बघा मनमोहक दृश्य
VIDEO | पहिल्यांदाच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल २१ हजार सूर्यफुलांची आरास, बघा लक्षवेधून घेणारं दृश्य
पुणे : चैत्र महिन्यात वसंत ऋतूमध्ये विविध फुलांना बहर येत असतो, त्यातीलच एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला करण्यात आला. मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली होती. पहिल्यांदाच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली. सजावटीमध्ये लावण्यात आलेल्या सूर्यफुलांमध्ये तेलबिया येत नसून या फुलांचा वापर केवळ सजावटीसाठी केला जातो. फुलांच्या पाकळ्यांचा रंग गडद भगवा असून मध्यभाग काळा आहे. ही फुले दिसायला खूप आकर्षक असून शेतातून काढल्यानंतर ७-८ दिवस पाण्यामध्ये व्यवस्थित राहतात. मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेल्या फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ही फुले अधिकच उठून दिसत होती. भाविकांनी ही आरास पाहण्यासोबतच हे दृश्य आपल्या मोबाईल मध्ये टिपण्याकरिता मोठी गर्दी केली होती.
Published on: Apr 04, 2023 02:42 PM
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
