AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मला आवडेल; काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मला आवडेल; काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य

| Updated on: Apr 25, 2023 | 12:35 PM
Share

Ravindra Dhangekar on Ajit Pawar Maharashtra CM : अजित पवार मुख्यमंत्री व्हायलाच हवं, अशी इच्छा काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केली आहे.

पुणे : अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मला आवडेल, असं काँग्रेसच्या नेत्यानं हे वक्तव्य केलंय. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्यावर भाष्य केलंय. अजित पवार मुख्यमंत्री व्हायलाच हवेत. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मला आवडेल. अजितदादा मोठे झालेलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीही आवडेल. अजितदादा हे दादा आहेत. दादा जे बोलतात तेच करतात, असं धंगेकर म्हणाले आहेत. पुणे लोकसभा कोणाला द्यायची हे महाविकास आघाडीचे नेते ठरवतील. पक्ष जो उमेदवार देईल तो मान्य असेल. सात वर्षापासून पुण्यात भाजपने आश्वासनाची खैरात दिली. भाजपला लोक आता मतं देणार नाहीत, असंही धंगेकर म्हणाले आहेत.

Published on: Apr 25, 2023 11:32 AM