AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा अपघात! 7 जणांचा मृत्यू

रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा अपघात! 7 जणांचा मृत्यू

| Updated on: Feb 24, 2026 | 11:14 AM
Share

रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा झारखंडमध्ये भीषण अपघात झाला. खराब हवामानामुळे झालेल्या या दुर्घटनेत दोन पायलटसह विमानातील सर्व सात जणांचा मृत्यू झाला. चतरा जिल्ह्यातील जंगलात कोसळलेल्या विमानाची चौकशी एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो करत आहे.

रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एका खासगी एअर अँब्युलन्सचा झारखंडमध्ये भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेत विमानातील दोन पायलटसह सर्व सात जणांचा मृत्यू झाला. रांची विमानतळावरून रात्री 7 वाजून 01 मिनिटांनी उड्डाण केलेल्या या विमानाचा, सुमारे 20 मिनिटांनंतर एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क तुटला. रात्री 7 वाजून 34 मिनिटांनी दक्षिण-पूर्व वाराणसी परिसरात संपर्क तुटल्याचे सांगण्यात आले. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे.

हे विमान एका रुग्णाला पुढील उपचारांसाठी दिल्लीला घेऊन जात होते. झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील खासिया ते करम तांड जंगलात हे विमान कोसळले. अपघातानंतर लगेचच एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. त्यांनी तपास सुरू केला असून मृतांचे मृतदेह जंगलातून बाहेर काढून त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. या भीषण अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Published on: Feb 24, 2026 11:14 AM