रोहित पवार यांच्याकडून तानाजीराव सावंत यांचा समाचार; केला थेट ‘खेकडा’ असा उल्लेख
शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी थेट आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्यावर जहरी टीका केली आहे. रोहित पवार यांनी धाराशिवमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात तानाजी सावंतांना सुनावताना त्यांना खेकड्याची उपमा देत जोरदार टोलेबाजी केली.
धाराशिव, 14 ऑगस्ट 2023 | कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार तर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी थेट आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्यावर जहरी टीका केली आहे. रोहित पवार यांनी धाराशिवमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात तानाजी सावंतांना सुनावताना त्यांना खेकड्याची उपमा देत जोरदार टोलेबाजी केली. खेकड्यांना खुप खाज असते असे मी ऐकलं आहे. तर असा खेकडा खाण्यापुर्वी ती खाज उतरावी लागते, येत्या काळात ती खाज उतरावी लागेल. ते जर कोरोना काळात मंत्री असते तर काय झाले असते याची कल्पना न केलेली बरी. आता खऱ्या अर्थाने हाफकीनला बोलावण्याची गरज आली आहे असा टोला देखील रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांना लगावला आहे. याबरोबरच त्यांनी काय टीका केलीय ते पाहा या व्हिडीओत…
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

